इलेक्ट्रिक तीन चाकी आणि इलेक्ट्रिक कमर्शियल लोडर्सचे ‘मेड इन इंडिया’ व्हेरिएंट्स लाँच
नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक दुचाकी ‘नेमो’ सुधारित कामगिरी आणि नवीन वैशिष्ट्यांसह
९९,००० रुपयांच्या (एक्स शोरूम) प्रारंभिक किंमतीत लाँच
मुंबई, – पर्यावरणपूरक वाहतूक सुविधांचा प्रसार करण्यासाठी त्याचा आधुनिक तंत्रज्ञान व सर्वोत्तम वैशिष्ट्यांशी मेळ घालत वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड (डब्ल्यूआयएमएल) या आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने आज ‘मेड इन इंडिया’ पॅसेंजर आणि कमर्शियल इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांची नवी श्रेणी उपलब्ध केली. जॉय ई- रिक ब्रँडअंतर्गत ही श्रेणी लाँच करण्यात आली असून त्याचबरोबर जॉय ई बाइक ब्रँडअंतर्गत हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर नेमो लाँच करण्यात आली आहे.
ड्रायव्हर तसेच प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक तीन चाकी वाहने अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि व्यवहार्य बनण्यासाठी कंपनीने प्रवासी वाहन विभागात दोन मॉडेल्स लाँच केली आहेत – जॉय ई- रिक V1 (L5) आणि जॉय बंधू (L3). कमर्शियल विभागात कंपनीने दोन मॉडेल्स लाँच केली आहेत – जॉय सहायक + कार्गो (L5) आणि जॉय इको लोडर (L3). कमर्शियल मॉडेल्स सर्व अधिकृत वितरकांकडे उपलब्ध करण्यात येणार आहेत.
देशभरात ई- वाहतूक सुविधा बळकट करण्यासाठी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी भारतातील विविध फ्लीट ऑपरेटर्सशी सहकार्य करून त्यांना लास्ट माइल डिलीव्हरी, शेयर्ड मोबिलिटी, लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी किफायतशीर वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यायाने इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढवण्याचे कंपनीचे ध्येय आहे. वॉर्डविझार्डचे आधुनिक तंत्रज्ञान आणि कामकाजातील कौशल्य यांमुळे फ्लीट ऑपरेटर्सना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, कामकाजाचा खर्च कमी करून कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. नाविन्यपूर्णता आणि स्थानिकीकरण यांवर लक्ष केंद्रित करत वॉर्डविझार्डद्वारे भारतीय फ्लीट ऑपरेटर्सच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील.
जॉय ई- बाइकची उत्पादन श्रेणी आणखी बळकट करण्यासाठी कंपनीने नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘नेमो’ लाँच केली असून बोल्ड डिझाइन, नवी वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान आणि प्रभावी कामगिरी ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. ही गाडी रायडर्सना सर्वाधिक आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा देण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहे. जॉय ई बाइकची नवी उत्पादने नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची ठरतील. नव्या मॉडेल्सचे बुकिंग आजपासून सर्व अधिकृत वितरकांकडे सुरू होईल.
नव्या उत्पादन श्रेणीविषयी डब्ल्यूआयएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, ‘दोन्ही व्यावसायिक विभागांतील आमची नवी उत्पादने भारताच्या हरित व पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. ‘द मेड इन इंडिया’ जॉय ई रिक मॉडेल्स आपल्या रस्त्यांवरील आव्हाने आणि ड्रायव्हरच्या अपेक्षा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहेत. जॉय ई बाइक विभागातील नेमो मॉडेलचे लाँच आमची उत्पादन श्रेणी बळकट करणारे तसेच नव्या, जागरूक पिढीच्या शाश्वत, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण वाहतूक सुविधांविषयी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे आहे. ही नवी उत्पादने ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत असून देशातील ईव्ही यंत्रणेतील आघाडीच्या कंपनीचे आमचे स्थान बळकट करणारी आहेत. शाश्वत वाहतूक सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने आम्ही हरित वाहतूक क्षेत्राच्या दिशेने प्रवास सोपा करणारी अत्याधुनिक उत्पादने पुरवण्यासाठी बांधील आहोत.’