केतन खेडेकर
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने एक मे कामगार दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच 36 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन रंग शारदा नाट्यमंदिर, लीलावती हॉस्पिटल जवळ, बांद्रा पश्चिम मुंबई येथे सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. या कामगार मेळाव्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांना तसेच कंपनीतील प्रतिनिधींना औद्योगिक शांतता हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये कामगार नेते आमदार भाई जगताप यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व कामगार बंधू आणि बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष एस आर सावंत आणि उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी केले आहे.