राजयोग मार्ग" ब्रम्हाकुमारींचा जीवनावर आधारित लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंती, दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ ने होणार सन्मानित, सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून गौरी कुलकर्णी यांना सन्मानित

Ketan khedekar April 29, 2025 08:20 PM

मुंबई :  " राजयोग मार्ग " "ब्रम्हाकुमारींच्या जीवनावर आधारित लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे.विक्रोळी सेवा केंद्र (घाट‌कोपर झोन) आणि Cineqube OTT प्रस्तुत राजयोग मार्ग या लघुपटाने विविध राष्ट्रीय आणि  आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये आपल्या आशयपूर्ण मांडणीमुळे गौरव प्राप्त केला आहे. ब्रम्हाकुमारींच्या आध्यात्मिक व प्रेरणादायी जीवनावर आधारीत असलेल्या या लघुपटाला भारत इंडिपेडन्स फिल्म फेस्टीव्हल व सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये सर्वोत्तम अभिनेता म्हणून रमेश खाडे आणि सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून गौरी कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.

या लघुपटाने वेस्ट बंगाल

 इंटरनॅशनल फिल्म मध्ये यश संपादन केले असून प्रसिद्ध दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ अंतर्गत सर्वोत्तम चित्रपटाला मान देखील पटकावला आहे. गणेश महिंद्रकर लिखित या लघुपटाचे दिग्दर्शन, पटकथा, लेखन आणि संकलन दिपक सवाखंडे यांनी केले असून त्यांचे सर्जनशील योगदान लघुपटाच्या यशामागे ठरले आहे. राजयोग मार्ग केवळ एक लघुपट नसून तो प्रेक्षकांना

अध्यात्मिकतेकडे वळवणारा आणि सकारात्मक जीवनपध्दतीचा संदेश देणारा प्रभावी चित्रपट आहे. त्यामुळे या लघुपटाचे संपूर्ण महारा‌ष्ट्रात कौतुक केले जात आहे. येत्या २५ मे २०२५ रोजी मुंबई या ठिकाणी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.