52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचा ८२ वा वर्धापनदिन बुधवार, दि. २१ जून, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार असून महनीय प्रवक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. शिरीष कणेकर हे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण श्री. कणेकर यांच्या हस्ते होणार आहे. श्री. कणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी केले आहे.