नॅशनल पोकर सिरीज इंडियाचे विक्रमी सहभागासह समापन

Santosh sakpal April 26, 2023 09:57 PM

• मेट्रो व द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील खेळाडूंनी स्‍पर्धेत घवघवीत यश मिळवले 

• दरभंगा, बिहार येथील विक्रम मिश्राने एनपीएस पोडियमवर अव्‍वल स्‍थान मिळवले 

• २०२३ मध्‍ये मिळालेल्‍या एकूण प्रवेशिकांमध्‍ये २५ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ, जेथे प्रवेशिकांमध्‍ये ९६,००० वरून १.२५ लाखांपर्यंत वाढ झाली 

• स्‍पर्धेत रोस्‍टरवरील महिला खेळाडूंच्‍या आकडेवारीमध्‍ये ३३ टक्‍क्‍यांची वाढ 

• दिल्‍ली राज्‍य पदक तालिकेमध्‍ये अव्‍वलस्‍थानी, महाराष्‍ट्र दुसऱ्या स्थानी व उत्तरप्रदेशचा क्रमांक तिसऱ्या स्थानी


नवी दिल्‍ली,  : नॅशनल पोकर सिरीज इंडिया (एनपीएस) २०२३ या पोकरबाझीवर आयोजित करण्‍यात आलेल्‍या भारतातील प्रतिष्ठित पोकर सिरीजने लक्षवेधक १८ दिवसांनंतर तिच्‍या तिसऱ्या पर्वाचे उत्‍साहवर्धक समापन केले. देशातील तीन टॉप पोकर टॅलेंट्सनी भव्‍य यश आणि जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधीत्‍व करण्‍यासाठी लास वेगासकरिता तिकिट मिळवण्‍यासाठी एकमेकांशी तगडी स्‍पर्धा केली. 

या प्रखर स्‍पर्धेमध्‍ये उत्तम कामगिरी करत दरभंगा, बिहार येथील विक्रम मिश्रा ४० गुण मिळवण्‍यासह तीन सुवर्ण पदक व दोन रौप्‍य पदक (मेडल लीडरबोर्ड) जिंकत विजयी ठरला. पोडियम अव्‍वल स्‍थान मिळवण्‍यासाठी अंतिम फेरी रोमहर्षक ठरली, जेथे हरियाणामधील अनिर्बन दासने दुसऱ्या स्‍थानासाठी उत्तरप्रदेशच्‍या अब्‍दुल अझिझ अन्‍सारीला पराभूत केले. या दोन्‍ही खेळाडूंना तीन सुवर्ण पदक व एक रौप्‍य पदक मिळाले, पण त्‍यांच्‍यामध्‍ये खेळवण्‍यात आलेल्‍या हँड्सच्‍या संख्‍येवरून अनिर्बन दास विजयी ठरला. 

सहभाग घेण्‍यासाठी एकूण १०७ स्‍पर्धांमध्‍ये २०२३ एडिशनने प्रवेशिकांमध्‍ये ९६,००० वरून (२०२२ मध्‍ये) १.२५ लाखांहून अधिकपर्यंत २५ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ करत मागील रेकॉर्ड्स मोडले. देशभरातून सहभागींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिसण्‍यात आला. दिल्‍लीमधील खेळाडूंनी एकूण ५५ पदकांसह पोल पोझिशन (अव्‍वल स्‍थान) मिळवले, तर महाराष्‍ट्राने ५१ पदकांसह दुसरे स्‍थान मिळवले. उत्तरप्रदेश (४५) आणि हरियाणा (३२) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्‍या स्‍थानावर राहिले, ज्‍यामधून अधिकाधिक प्रदेशांमध्‍ये खेळाची लोकप्रियता वाढत असल्‍याचे दिसून येते. तसेच, उल्‍लेखनीयरित्‍या नॅशनल पोकर सिरीज इंडिया २०२३ मध्‍ये रोस्‍टरवर महिला खेळाडूंच्‍या आकडेवारीत ३३ टक्‍क्‍यांची वाढ देखील दिसण्‍यात आली. 


नॅशनल पोकर सिरीज इंडिया लीडरबोर्डवर गुरगावच्‍या अवनीश मुंजाळने १८५१६ गुणांसह अव्‍वल स्‍थान मिळवले, तर गोव्‍याच्‍या चिराग सोधाने १८१८७ गुणांसह दुसरे स्‍थान मिळवले, ज्‍याने स्‍पर्धेच्‍या मागील पर्वामधील आपली विजयी गाथा पुढे देखील सुरू ठेवली. तसेच स्‍पर्धेत कोल्हापूर, नौतनवा, जबलपूर, छत्तीसगड, रांची, दरभंगा, कटिहार आणि चाम अशा द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील लक्षणीय सहभागी दिसण्‍यात आले, ज्‍यांनी पदक मिळवत दैनंदिन स्‍पर्धांमध्‍ये आपली छाप निर्माण केली. 

नॅशनल पोकर सिरीज २०२३ दरम्‍यान १०७ स्‍पर्धांमध्‍ये आणि स्‍पर्धेच्‍या पोडियममध्‍ये ३२४ पदक देण्‍यात आली. प्रतिष्ठित स्‍पर्धा व तिच्‍या खेळाडूंच्‍या यशाला साजरे करण्‍यासाठी नॅशनल पोकर सिरीज इंडिया अवॉर्ड्स नाइट ६ मे रोजी दिल्‍ली येथे आयोजित करण्‍यात येणार आहे, जेथे भारताची शान व बॉक्सिंग क्‍वीन मेरी कॉम यांच्‍या हस्‍ते विजेत्‍यांना गौरविण्‍यात येईल.