सत्ता आल्यावर फक्त लुटा : चंद्रपूरातून मोदींची इंडिया आघाडीवर टीका

Santosh Gaikwad April 08, 2024 06:59 PM



चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला विदर्भापासून सुरुवात झाली. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात आलेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर कडाकडून टीका केली.  सत्ता आल्यावर फक्त लुटा असा इंडिया आघाडीचा मंत्र असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. 

आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीकडून विकासकामांना विरोध केला जात होता. गरिबांसाठी आणलेल्या पीएम आवास योजनेचा लाभ मिळू दिला नाही. काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप मोदींनी केला. सत्ता आल्यावर फक्त लुटा असा इंडिया आघाडीचा मंत्र असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. महाराष्ट्रातील विकासकामांना इंडिया आघाडीने विरोध केला. विकासकामांच्या वेळी इंडिया आघाडीकडून दलाली मागितली जात होती. असा आरोपही मोदी यांनी केला.