विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचे बिगुल वाजलं : १० जूनला होणार मतदान

Santosh Gaikwad May 08, 2024 05:19 PM


   मुंबई, दि. ८ :  विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या रिक्त हेाणा-या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सोमवार दि १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर या निवडणुका होणार आहेत. 

 मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस, केाकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांची मुदत ७ जूलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली आहे. 

या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल.  त्यानंतर बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर २७ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.   सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.  होईल. १८ जून २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.
------