भारतातील घरगुती उत्पादनांची बाजारपेठ १५% सीएजीआरने वृद्धिंगत होत राहील

Santosh Sakpal July 05, 2023 09:41 PM

मुंबई, ५ जुलै २०२३: घरगुती वापराचे टेक्सटाईल्स, फर्निशिंग्स, घरगुती सजावटीच्या वस्तू, फर्निचर आणि विविध प्रकारच्या हाऊसवेयर्सचा ज्यामध्ये समावेश आहे अशी घरगुती उत्पादनांची भारतीय बाजारपेठ पुढची कमीत कमी दहा वर्षे तरी १५% सीएजीआरने वृद्धिंगत होत राहील. विकसित जगाशी तुलना केली तर भारतात या उत्पादनांचा दरडोईवापर खूप कमी आहे आणि त्यामुळे भारतीय ग्राहकांची विनिमय शक्ती वाढत असल्याचे लक्षात घेता, देशांतर्गत बाजारपेठेचे भवितव्य उज्वल असणार असा विश्वास एचजीएच इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अरुण रुंगटा यांनी व्यक्त केला. मुंबईत बॉम्बे एक्सहिबिशन सेंटर येथे एचजीएच इंडियाच्या १३ व्या आवृत्तीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या ट्रेड शोचे उदघाटन टेक्सटाईल्स मंत्रालयाच्या सचिव टेक्सटाईल्स श्रीमती रचना शाह आणि टेक्सटाईल आयुक्त श्रीमती रूपराशी यांनी केले. विशेष अतिथी, आयआयआयडी (मुंबई)चे चेअरमन श्री. हसमुख शाह, आर्किटेक्ट रेझा काबुल आणि आर्किटेक्ट हितेन सेठी यांनी यावेळी समस्त आर्किटेक्ट समुदायाचे प्रातिनिधीत्व केले.
ते पुढे म्हणाले की, घरगुती वापराचे टेक्स्टाईल्स, घरातील सजावटीच्या वस्तू, घरगुती फर्निचर, हाऊसवेयर आणि भेटवस्तू या उत्पादनांचा ट्रेड शो एचजीएच इंडिया वर्षातून दोनदा आयोजित केला जातो. ज्यामध्ये घरगुती रिटेलर्स, प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट आणि या उद्योगक्षेत्रातील इन्स्टिट्यूशनल खरेदीदार यांच्यासाठी अनेक नवीन सोर्सिंग सोल्युशन्स व व्यवसाय संधी पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत."
टेक्सटाईल्स मंत्रालयाच्या सचिव टेक्सटाईल्स श्रीमती रचना शाह यांनी भारतातील घरगुती वापराच्या टेक्सटाईल्सच्या बाजारपेठेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, "या उद्योगक्षेत्रातील विविध ब्रँड्स, उत्पादक, रिटेलर्स आणि होलसेलर्स यांना एकत्र आणणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम एचजीएच इंडियाने सुरु केला आहे. ते कारीगरांना देखील सहयोग प्रदान करत आहेत. गेल्या १२ एडिशन्समध्ये एचजीएच इंडियाचा प्रभाव सातत्याने वाढत आहे आणि यंदाची त्यांची १३वी वेळ असून यावेळी हा ट्रेड शो अजून जास्त मोठा असल्याचे दिसून येत आहे.
एचजीएच इंडियामध्ये ३२ देशांमधील ७०० ब्रँड्स आणि उत्पादक सहभागी होत आहेत, त्यामुळे ट्रेड व प्रोफेशनल खरेदीदारांना मर्चन्डाईजची अभूतपूर्व श्रेणी पाहायला मिळेल, आगामी दिवाळी व सणासुदीच्या रिटेल सीझनसाठी त्यांच्या व्यवसाय क्षमतांना चालना देण्यात याची खूप जास्त मदत होईल. एचजीएच इंडियामध्ये सहा विभागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे ज्यामध्ये वर्ल्ड ऑफ स्लीप, होम फर्निचर, वॉल्स अँड विंडोज, फ्लोर अँड डेकोर, स्मार्ट किचन व किड्स होम यांचा समावेश आहे.
यंदाच्या एचजीएच इंडियाने रिटेलर्स व वितरकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. होम फर्निचर कॅटेगरी हे एचजीएच इंडियाचे अनोखेपण ठरले आहे. सोर्सिंग संधींच्या शोधात असलेले अनेक आर्किटेक्ट व इंटेरियर डिझायनर एचजीएच इंडियाला भेट देतील. एचजीएच इंडिया जुलै २०२३ ची सांगता ७ जुलै रोजी होईल आणि १४ वे एचजीएच इंडिया ग्रेटर नोएडा येथे १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.