अमित तांबे यांना पितृशोक

Ketan khedekar June 16, 2025 05:06 PM



मुंबई दिनांक १६~ रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित तांबे यांच्या वडिलांचे जनार्दन तांबे यांचे  काल वयाच्या 80 व्या वर्षी बांद्रा पूर्व येथील गुरुनानक रुग्णालयात दुःखद निधन झाले. दिवंगत जनार्दन तांबे यांच्या पार्थिवावर काल रात्री बांद्रा पूर्व येथील खेरवाडी स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आंबेडकरी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी जनार्दन तांबे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दिवंगत जनार्दन तांबे यांच्या अंत्ययात्रेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे;विवेक पवार ,बौद्धजन पंचायत समितीचे लक्ष्मण भगत प्रकाश मोरे  प्रकाश जाधव भीमराव सावतकर  सुमित वाजळे  तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते बौद्ध धम्म चळवळीचे प्रचारक समाजसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*दिवंगत जनार्दन तांबे यांची 22 जून रोजी श्रद्धांजली सभा*

दिवंगत जनार्दन तांबे यांची दिनांक 22 जून रोजी पुण्यानुमोदन आणि श्रद्धांजली सभा  बांद्रा पूर्वेतील सिद्धार्थ कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थाना जवळच्या बुद्ध विहारात आयोजित करण्यात आले आहे. दिवंगत जनार्दन तांबे यांचे बौद्ध धम्म प्रसार आणि आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान होते त्यांचे पुत्र अमित तांबे हे रिपब्लिकन चळवळीत मुंबईमध्ये तरुणांचे चांगले नेतृत्व करीत आहेत तांबे घराण्याने बांद्रात आंबेडकरी चळवळी मोठे योगदान दिले आहे दिवंगत जनार्दन तांबे हे मूळचे मंडणगड तालुक्यातील सावरी गावचे रहिवासी आहेत मुंबईत बांद्रा सिद्धार्थ कॉलनी ते राहावयास होते मंडनगड सावरी गावात आणि बांद्रा येथील सिद्धार्थ कॉलनी दिवंगत जनार्दन तांबे यांनी आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान दिले आहे त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेक मान्यवरांनी विनम्र श्रद्धांजली वाहिले आहे.