भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा पराक्रमाचा आम्हाला अभिमान :; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

Ketan khedekar May 10, 2025 06:42 PM


मुंबई प्रतिनिधी 

भारतीय सैन्याने अपूर्व साहस शौर्य दाखवून पाकिस्तानमध्ये घुसून दहशवाद्यांचे अड्डे  उध्वस्त  केले.पाकिस्तानी सैन्याने केलेले ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले निरस्त करून पाकिस्तानवर प्रतिहल्ले करून पाकचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय सैन्याने केले आहे.भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे आज प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे.आपल्या भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचा; सर्व सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे खंबीर नेतृत्व आणि भारतीय सैन्य दलाचा शिस्तबध्द नियोजनपूर्वक केलेल्या  कामगिरीतून पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे हे सत्य जगासमोर उघडे करण्यात भारत यशस्वी झाला आहे.या आतंकवादी पाकिस्तान चे भारतीय सैन्याने कंबरडे मोडले असले तरी आतंकिस्तान चे मनसुबे नापाक आहेत.त्यामुळे पाक ला खाक केले पाहिजे. अती आतंकवाद करणाऱ्या पाकिस्तान ची माती केली पाहिजे. पाक मातीत मिळवून खाक केले पाहिजे.हे काम  पराक्रमी भारतीय सैन्य करू शकते याचा आम्हाला विश्वास आहे.आमच्या भारतीय सैन्याची हिंमत ताकद आणि शौर्य पाहून आमची मान गर्वाने उंच होत आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.भारतीय सैन्याच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे असे सांगत भारतीय सैन्याला पकविरुद्ध च्या लढ्यासाठी देशवासीयांच्या मनःपूर्वक कोट्यवधी शुभेच्छा आहेत असे ना.रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.