मोटार कार विक्रेत्याची भीषण हत्या

Ketan khedekar May 26, 2025 01:10 PM



मुंबई प्रतिनिधी: घाटकोपरच्या पंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रविवारी दुपारी एका मोटार विक्रेत्याची भीषण हत्या करण्यात आली. 

  दुर्दैवी मयत तरुणाचे नाव झिशान खान असे असून तो पार्कसाईट, विक्रोळी येथे मोटार कार विक्रीचा व्यवसाय करायचा. विक्रोळी येथील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार झिशान हा काल दुपारी अडीच वाजता आपल्या काही मित्रांसोबत मोटारीने कुर्ला सीएसटी येथे निघाला होता. रस्त्यात ओव्हरटेक करण्यावरून त्याचा एका स्कूटर स्वराशी वाद झाला. त्या स्कूटरवर मागच्या सीटवर एक महिला देखील बसली होती. रागा भरात स्कूटर स्वराने चोपर काढला व झिशनवर सपासप वार केले. त्यात झिशांचा मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.