आर्यन देशमुखच्या अष्टपैलू खेळामुळे विहंग विजयी

Santosh Sakpal May 03, 2023 07:53 AM


प्रतिनिधी/शिवनेर

मुंबई:   सलामीवीर आर्यन देशमुखचे ७ चौकारांसह नाबाद अर्धशतक व अचूक फिरकी गोलंदाजीत २ बळी, यामुळे विहंग एन्टरप्राईजेसने पिक परफॉर्मंझ संघाचा १० गडी राखून पराभव केला आणि एमसीए कार्पोरेट एफ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत विजयीदौड केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पिक संघाला एलफिस्टन-आझाद मैदानावर लाभदायक ठरला नाही. फिरकी गोलंदाज सय्यद हशीम (१३ धावांत ३ बळी), आर्यन देशमुख (१० धावांत २ बळी), नीलकंठ तानपुरे (१७ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे विहंगने पिक संघाचा डाव १९.५ षटकात ८८ धावसंख्येवर गुंडाळला. विहंग संघाचे विजयी लक्ष्य १० गडी राखून साध्य करतांना सलामीवीर राहुल कोदावूर (३४ चेंडूत नाबाद ३७ धावा) व आर्यन देशमुख (३९ चेंडूत नाबाद ५२ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची अभेद्य फटकेबाजी केली.  


******************************