व्हिक्टरी क्रिकेट क्लबची महिलांमध्ये व्हिक्टरी

Santosh Sakpal 20, 5-19 10:54 PM

mumbai :    व्हिक्टरी क्रिकेट क्लबच्या महिला क्रिकेट संघाने मुंबई क्रिकेट असोसिएशनची पहिली महिला लीग क्रिकेट स्पर्धा जिंकली. व्हिक्टरी क्रिकेट क्लबने फोर्ट यंगस्टर्स महिला क्रिकेट संघाचा ३ विकेटने चुरशीचा पराभव केला. सीमा ठाकोर व मुल्ला अलींनाची फलंदाजी आणि सारिका कोळीची गोलंदाजी व्हिक्टरी क्लबला विजयासाठी उपयुक्त ठरली. यंदापासून प्रथमच सुरु झालेल्या एमसीए महिला लीग क्रिकेटला महिला क्रिकेट खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभला होता.


   बीकेसी येथील एमसीए मैदानावर व्हिक्टरी क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी फोर्ट यंगस्टर्सला प्रथम फलंदाजी दिली. जान्हवी काटे (४३ धावा) व झील डिमेलो (३६ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करूनही फोर्ट यंगस्टर्सचा डाव १९.४ षटकात १२७ धावसंख्येवर समाप्त झाला. सारिका कोळीने (११ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तर देतांना सीमा ठाकोर (नाबाद ३८ धावा) व मुल्ला अलींना (३३ धावा) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे व्हिक्टरी क्रिकेट क्लबने १९.२ षटकात ७ बाद १२८ धावांसह विजयी लक्ष्य पार केले. परिणामी फोर्ट यंगस्टर्स संघाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.