मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
छावा हा चित्रपट विकी कौशल मुळे चालला नाही असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मिरची मराठी ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. महेश मांजरेकर म्हणाले, विकी हा उत्तम अभिनेता आहे. पण त्याच्यामुळे छावाला यश मिळाले असे नाही. तसे जर असते तर त्याचे आधीचे पाच चित्रपट फ्लॉप गेले नसते. विकी हा उत्तम अभिनेता आहे. छ*** ने 800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण लोक विकीला पहायला आले नाहीत तर त्याच्या भूमिकेला पाहण्यासाठी आले. माझ्या महाराष्ट्राने छावाला यश मिळवून दिले. महाराष्ट्रात 80 टक्के धंदा झाला. विशेषतः पुण्यात 90% तर उर्वरित महाराष्ट्रात दहा टक्के धंदा झाला. महाराष्ट्र हा हिंदी सिनेसृष्टी वाचवू शकतो हे यामुळे दिसून आले.