अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर !

Santosh Gaikwad April 15, 2023 10:44 AM

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अमित शहा आज  मुंबई दौऱ्यावर येत आहे .एकीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह असतानाच, आणि दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुक या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे उद्या ( रविवारी) हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा  सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  स्वतः तयारीचा आढावा घेत आहेत. या कार्यक्रमासाठी  20 लाख समर्थक उपस्थित राहतील असा अंदाज आहे 

अमित शहा आज सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर सह्याद्री अतिथी गृहावर भाजप च्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी यासंदर्भात अमित शहा आढावा घेणार आहेत.