फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही : उद्धव ठाकरेंची जहरी टीका

Santosh Gaikwad April 04, 2023 09:19 PM

ठाणे : युवती सेनेच्या कार्यकर्ती रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून  शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. आला.फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही अश्या शब्दात ठाकरे 


  ठाण्यातील युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. रोशनी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मंगळवारी पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाणे येथील रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत तिखट शब्दात राज्यातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि कायदा सुव्यवस्थेचा समाचार घेतला. ठाकरे म्हणाले की, फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही झालं तर लगेच एसआयटी नेमली जाते. अटक केली जाते. मिंधे गटाकडून काही लोकांवर हल्ले झाले तर तिकडे फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही. एकूणच, गुंडागर्दीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंडमंत्री? मी म्हणत नाही, पण गुंड पोसणारं एक खातं असतं. त्यांनी जाहीर करावं. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री असं खातं तयार करावं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.


“सर्वोच्च न्यायालय म्हणतेय तसं या सरकारसारखे आम्ही शिवसैनिक नपुंसक नाहीत. मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून मुळासकट उखडून टाकण्याची जिद्द ठाण्याच्या नागरिकांमध्ये आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आयुक्त असून पदासाठी लाचारी करत असतील तर पदभार स्वीकारताना शपथ घेतली असेल तर त्या शपथेशी प्रतारणा आहे. बिनकामाचा आयुक्त याला निलंबित करा किंवा बदली करा. कणखर आयुक्त ठाण्याला द्या.  असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.