ज्येष्ठ पत्रकार कै. वसंत आत्माराम मोरे जन्मशताब्दी निमित्त अभिवादन

Santosh Gaikwad January 01, 2024 08:03 PM


मुंबई: ज्येष्ठ पत्रकार कै. वसंत आत्माराम मोरे यांची आज १ जानेवारी २०२४ रोजी. जन्मशताब्दी. त्यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी त्याच्या तस्विरीस पुष्पहार अर्पण करुन तर इतरांनी पुष्पांजली वाहून त्यांचे पुण्यस्मरण केले. सर्वश्री वाबळे व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी कै. मोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे देखील उपस्थित होत्या.