शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

Narendra Wable March 23, 2023 12:00 AM



शहीद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.


यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.