गाडीच्या आत एकाच वेळी सापडल्या तीन मृतदेह; कसारा परिसरातील घटना

Ketan khedekar June 06, 2025 07:56 PM

कसारा येथे एका गाडीच्या आत तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही मृतदेह मुंबईतील रहिवासी असलेल्या मित्रांचे असून, ते अनुक्रमे पोवई, कुर्ला आणि अंधेरी येथील आहेत.

घटनास्थळी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.