शिंदे गटाने सर्वच राजकीय पक्षांना 'घेतले शिंगावर'!

Santosh Sakpal November 06, 2023 09:42 PM

पोलादपूर तालुक्यात शिंदे गट 17, शेकापक्ष 2,
ठाकरे गट 2 व ग्रामविकास 1 कडे ग्रामपंचायत

 

पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा कौल एकहाती शिवसेना शिंदे गटाकडे पर्यायाने आ.भरत गोगावले यांच्या नेतृत्वाकडेच राहिल्याचा कल दिसून आला. शिंदे गट 17, शेकापक्ष 2, ठाकरे गट 2 व ग्रामविकास 1 कडे ग्रामपंचायत असा 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल दिसून आला. पोलादपूर तालुक्यात निकालानंतर भगवे वातावरण दिसून आले. शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना उबाठा, शेकापक्ष आणि जनता दल सेक्युलर या सर्वच पक्ष अंगावर आल्याने घेतले शिंगावर असे दिसून आले.
शिवसेना शिंदे गटाकडे देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, चरई, काटेतळी, महालगूर, सडवली, माटवण, मोरसडे, पांगळोली, कोंढवी, महाळुंगे, गोवेले, देवपूर आणि मोरगिरी, कुडपण बुद्रुक, काटेतळी या बिनविरोध  तर शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यातून सडवली ग्रामपंचायत गेली असली तरी धारवली आणि बोरावळे ग्रामपंचायती राखण्यात यश आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला बोरज ग्रामपंचायत बिनविरोध तर शिंदे गटाकडून सवाद ग्रामपंचायत खेचून आणण्यात यश आले आहे. आडावळे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीची सत्ता आली आहे.
देवळे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या सुनिता मेस्त्री तर शैलेश कदम, शंकर केसरकर, मंदाबाई पोकळे, दत्ताराम घाडगे, मंदाबाई जाधच, सुमन एकनाथ केसरकर, किसन रिंगे, सुरेखा शेलार, सुप्रिया खोपकर सदस्यपदी निवडून आले.
सडवली ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या रोहिणी जाधव, कृष्णा गायकवाड, उषाबाई जाधव, सारिका वायकर, काळू पवार, स्वाती जाधव, संतोष जाधव, शुभांगी कदम आदी सदस्य निवडून आले. याठिकाणी शेकापक्ष विरूध्द शिवसेना शिंदे गट अशी लढत होती.
मोरसडे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम सुतार, तुकाराम उतेकर, गंगूबाई उतेकर, कृष्णाबाई नरे, गणपत उतेकर, हेमलता उतेकर, प्रतिक्षा सालेकर, दिपक सालेकर आदी सदस्य निवडून आले.
गोवेले ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या मंदा अहिरे तर सदस्य पदी गंगाराम सुतार, सुजाता पार्टे, निवृत्ती सकपाळ, लक्ष्मी जाधव, नंदा झाडाणे, रमेश मोरे, सुनिता भगत आदी निवडून आले.
पांगळोलीमध्ये सरपंच पद रिक्त राहिले असून ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे भगवान शेलार, सुमन उफाळे, वनिता मोरे, शशिकला जाधव, नंदकुमार जाधव, गंगूबाई कदम आदी निवडून आले. याठिकाणी सर्वात कमी मतदारसंख्या असूनही निवडणुकीला सामोरे जावे लागले.
माटवण ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या बाया वाघे आणि सदस्यपदी आफताब नाडकर, शालिनी गायकवाड, महेजबीन नाडकर, बाळकृष्ण नगरकर, मीना मुकणे, उज्ज्वला मांढरे, प्रमोद करंजे आदी निवडून आले.
कोंढवी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या वनिता शिंदे, कृष्णा दरेकर, संचिता निकम, ज्योती भोसले, निशान दरेकर, लक्ष्मीबाई सकपाळ, अमोल शिंदे, ज्योती यादव आदी सदस्य निवडून आले.
महालगूर ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या मंदा साळवी, रवींद्र मोरे, पार्वती कदम, सुंदराबाई जाधव, संतोष कदम, जयश्री सकपाळ, प्रणित देवधरे, देवकाबाई जाधव आदी सदस्य निवडून आले.
चरई ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे संदेश कासार,  विनोद कडू, काजल जाबडे, रंजना साळवी, रुपेश सुतार, मुनिरा मजगणकर, सतीश बांदल, सोनल सुतार आदी सदस्य निवडून आले.
कापडे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या अदिती मोरे, सदस्यपदी अशोक मोरे, नितेश चव्हाण, संगीता पवार, बबन पवार, शैला शेलार, अरूणा सकपाळ, जितेंद्र सकपाळ, निलम धुमाळ, अमीता माने आदी निवडून आले.
पळचिल ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या शांताबाई निविलकर तर सदस्यपदी सुनिता जाधव, प्रेमा जाधव, निवृती जाधव, नेहा अजगणकर, नारायण साळवी, दिनेश सुतार, अनुसया फाळके आदी निवडून आले.
महाळुंगे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या विकास नलावडे, सुखदेव चव्हाण, सुरेखा चव्हाण, सुजाता पवार, प्रमोद चव्हाण, अर्जून चव्हाण, लक्ष्मीबाई चव्हाण आदी सदस्य निवडून आले.
देवपूर ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे सिध्देश्वर महाडीक तर सदस्यपदी दिपाली महाडीक, रोशनी उतेकर, रूणाल जगदाळे, उषा कदम, सुलोचना शिंदे, सुरेश शिंदे आदींची निवड झाली.
वाकण ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे शांताराम जंगम तर विठोबा गायकवाड, अरूणा जाधव, संध्या गुरव, रामचंद्र साने, रेश्मा पवार, नारायण सकपाळ, अनंत कुंभार, संगीता बाबर, शशिबाई वाघे आदी सदस्य निवडून आले.
शेकापक्षाने यावेळी धारवली ग्रामपंचायतीवर लालबावटा फडकविला असून विलास सकपाळ सरपंचपदी विजयी झाले. अब्बास फकीर,वैखरी महाकाळ, शीतल सकपाळ, आफरिन करबेलकर, भाग्यश्री वरवाटकर, विनिता सकपाळ, आशा जंगम, प्रल्हाद चाचले, वैभव शिंदे हे सदस्यपदी विजयी झाले.
बोरावळे ग्रामपंचायत शेकापक्षाकडे गेल्या अनेक वर्षांपासून असून या निवडणुकीतही लालबावटा फडकविण्यात यश मिळाले आहे. संचिता वैभव चांदे या सरपंचपदी विजयी झाल्या आणि सदस्यपदी अजित कंक, सुनंदा उतेकर, महादेव महाबदी, लिलाबाई पार्टे,अर्जून महाबदी, मनिषा उतेकर, सुमन गुडेकर यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
सवाद ग्रामपंचायत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात आली असून शर्मिला उतेकर यांची सरपंच पदी निवड झाली आहे.  गजानन लाड, नम्रता पाटेकर, पायल जाधव, शबीर तार्लेकर, अमृता वाळणकर, सुरेश पाटेकर, आशा खेडेकर यांची सदस्यपदी निवड झाली.  शिंदे गटाचे पाच सदस्य विजयी झाले असून ठाकरे गटाच्या एका सदस्याची मते शिंदे गटाच्या उमेदवाराएवढीच असल्याने चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडी सरपंचपदी रूपाली मोरे, दिलीप बांदल, अनिता पवार, निर्मला करंजे, मृणाली करंजे, सविता मालुसरे, संदीप पंडीत, निर्मला करंजे आदी सदस्यपदी निवडून आले आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, संपर्कप्रमुख किशोर जाधव, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, सतीश शिंदे, शौकत तारर्लेकर, गणपत उतेकर, कृष्णा रिंगे, अनिल दळवी, चंद्रकांत जाधव, अंकूश सकपाळ कार्यकर्ते तर शेकापक्षाकडून एकनाथ गायकवाड, समीर चिपळूणकर, वैभव चांदे, ठाकरे गटाकडून अनिल मालुसरे, अनिल नलावडे, दिलीप भागवत, अनंत पार्टे, अमर नगरकर, निलेश सुतार तसेच अन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृष्णा करंजे, खेडेकर व अन्य कार्यकर्ते तर भारतीय जनता पक्षाकडून तुकाराम केसरकर आदींनी विशेष मेहनत घेतली.