क्रौर्याची परिसीमा:रक्ताने भरलेल्या बादल्या, मिक्सरमध्ये बारीक केले मांस; सरस्वतीच्या मारेकऱ्याच्या घरातील दृश्य अंगावर शहारे आणणारे

Santosh Sakpal June 08, 2023 10:16 PM


 

बुधवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी पोलिसांचे एक पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले. तिथे ते दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळालेल्या फ्लॅटवर पोहोचले. 7 व्या मजल्यावरील या फ्लॅटमध्ये पोहोचताच पोलिसांना धक्काच बसला. कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले व ऐकले होते, ते तिथे त्यांना प्रत्यक्ष पहावसाय मिळाले.

रक्ताने माखलेले 3 कटर जप्त

पोलिसांना फ्लॅटमधून एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारे 3 कटर आढळले. हे तिन्ही कटर रक्ताने अक्षरशः माखलेले होते. पोलिसांनी या प्रकरणी 56 वर्षीय आरोपी मनोज साहनी नामक व्यक्तीला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अंगावर काटे आणणारे धक्कादायक सत्य उघड केले.

पॉलिथिनमध्ये ठेवले होते तुकडे

आरोपीने सांगितले की, त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीने काही कारणांमुळे आत्महत्या केली होती. घरी परतल्यानंतर तिचा मृतदेह पाहून मी घाबरलो. मी दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांडाविषयी वाचले होते. त्यानुसार, मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

 

मिक्सरमध्ये मांस बारीक दळले, त्यानंतर कुकरमध्ये शिजवले

यासंबंधीच्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी बाजारातून झाड कापण्याचे यंत्र आणले होते. त्यानंतर सलग 3 दिवस घरात आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. आरोपीने मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. मृतदेहाचा दुर्गंध पसरू नये म्हणून त्याने हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक दळले. त्यानंतर कुकरमध्ये शिजवले. त्याने हाडे, मांस व रक्त वेगळे केले होते. यापैकी काही अवयव शिजवून त्याने कुत्र्यांनाही खाऊ घातले.

हिरव्या - काळ्या बादल्यांत आढळले रक्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटच्या किचनजवळ हिरव्या व काळ्या रंगाच्या बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या पूर्णतः रक्ताने माखलेल्या होत्या. मृतदेहाचे छोटे - छोटे तुकडे करून ते रक्ताने माखलेल्या या बादल्यांत ठेवले होते. खोलीत मृत महिलेचे केस ठेवल्याचेही आढळले. तसेच काळ्या पॉलिथिन बॅगही आढळल्या. विशेषतः अनेक प्रकारचे एअर फ्रेशनरही घटनास्थळी आढळले. या फ्रेशनर्सचा वापर दुर्गंधी आटोक्यात आणण्यासाठी केला जात होता. तूर्त पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेत. पुढील तपास करण्यासाठी फ्लॅट क्रमांक 704 सील करण्यात आला आहे.

 

शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले

फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार आरोपीच्या शेजाऱ्याने पोलिसांना दिली. मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र वास येत असल्याची माहिती शेजारी सोमेश श्रीवास्तव यांनी सोसायटीतील इतर लोकांना दिली होती. सोमेश श्रीवास्तव पोलिस पथकासह मनोजच्या फ्लॅटमध्ये दाखल झाले. त्यांनी तिथे आपल्या डोळ्यांनी पाहिलेले दृश्य आम्हाला सांगितले. ते म्हणाले - फ्लॅटमधून विचित्र वास येत होता. मी अनेक अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये अशी दुर्गंधी कशामुळे येते हे पाहिले. याविषयी मी माझ्या आईला सांगितले. पण आई म्हणाली की उंदीर मेल्यानंतरही असा वास येतो. मी खूप विचार करत केला. पण मनोजच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येणे कमी न झाली नाही. मंगळवार सकाळपर्यंत दुर्गंधी येणे सुरूच होते.

मनोज अंकल म्हणाले – गटारीचा वास येत असेल

ते म्हणाले की, मी याविषयी सोसायटीच्या समितीकडे तक्रार करण्याचे ठरवले. काही वेळानंतर मी खाली गेलो. समितीकडे तक्रार केली. आम्ही बोलत असताना मला मनोज अंकल दिसले. मी त्यांना सांगितले की, तुमच्या फ्लॅटमधून विचित्र दुर्गंध येत आहे. त्यावर त्यांनी मला तो वास गटारीचा असल्याचे सांगितले. त्यावर मी आत जाऊन पाहण्याचा आग्रह धरला. त्यानंतर अंकल यांनी रात्री परत आल्यानंतर पाहू असे सांगितले. असे बोलून ते तेथून निघून गेले.

पोलिसांना फोन केला अन् मृतदेह आढळला

त्यांनी सांगितले की, अंकल निघून जाताच आम्ही याविषयी नया नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस आले. आम्ही मनोज यांच्या फ्लॅटवर पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना फ्लॅटमध्ये मृतदेह असल्याचा संशय आला. आम्ही दरवाजा तोडून पोलिसांसह फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आत शिरताच एकच उग्र दरप आला. तो एवढा जास्त होता की, तिथे क्षणभरही उभे राहणे कठीण झाले होते. हॉलमध्ये झाड कापण्याचे यंत्र (चेनसॉ) पडले होते. बेडरुममध्ये गेलो तर तिथे अनेक काळ्या रंगाचे प्लास्टिक (पॉलीथीन) पडलेले होते. तिथे एक मोठे काळे प्लास्टिकही पडले होते. बाजूलाच महिलेचे केसही पडलेले होते.