झुकेगा नहीं घुसेगा डायलॉग भारीच, ...पण अंधारेची फडणवीसांच्या डायलॉग बाजीवर टीका ..

Santosh Gaikwad April 05, 2023 03:04 PM

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फडतूस गृहमंत्री लाभला, या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मै झुकेगा नही घुसेगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र फडणवीस यांच्या डायलॉगबाजीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी  टीका केली आहे. अंधारे यांनी ट्विट केलं असून, ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.


ठाण्याच्या युवती सेनेच्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. रोशनी शिंदे यांना रुग्णालयात दखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली त्यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मै झुकेगा नही घुसेगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे दोन्ही शब्द चर्चेत आहेत. मात्र फडणवीस यांच्या टीकेला सुषमा आंधरे यांनीही प्रतिउत्तर दिलय.फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे.


*. सुषमा अंधारे ट्विटमध्ये काय म्हणाल्या..*


“झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव” असं सुषमा अंधारे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.