एजे आणि लीला यांचं नातं आणखी घट्ट होताना बघून सुना अस्वस्थ

Santosh Sakpal December 18, 2024 03:59 PM

सिने पत्रकार /संतोष सकपाळ 

नवीन वळण घेत, एजे आणि लीला यांचं नातं आणखी दृढ होतंय. लीला घराच्या जबाबदारीला सामोरे जात असताना, दुर्गा,लक्ष्मी, सरस्वती सतत अडचणी निर्माण करतायत. याच दरम्यान, किशोर लीलाच्या प्रयत्नांना असफल करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यामुळे लीलाला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करायला लागतोय. एका धक्कादायक वळणावर, घरात कोणी नसताना एक चोर लीला वर हल्ला करतो. मात्र, लीला या हल्ल्यापासून वाचते. या धाडसामुळे एजे लीलाच्या आणखी जवळ येतो, मात्र यामुळे दुर्गा अस्वस्थ होते. आता लीला ला एजे सोबत एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. एजेसोबत काम करण्याचा विचार तिला उत्साहित करतो. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान, एजे आणि लीला यांचं नातं आणखी दृढ होत जाणार आहे. 

या सर्व घडामोडी अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर !