मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२३ चा निकाल जाहीर ‘दीपावली’ सर्वोत्कृष्ट !

Santosh Gaikwad February 22, 2024 05:14 PM


मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  २३ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत एक लाख रुपये रकमेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 'दीपावली' अंकास जाहीर झाला. मुं बई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रतिष्ठेचे हे निकाल आज जाहीर केले. 


राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे,  डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी तर रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक म्हणून संघाचे ज्येष्ठ सदस्य दिपक म्हात्रे यांनी काम पाहिले. खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.पारितोषिक वितरण कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात येईल.


राज्यस्तरीय निकाल पुढीलप्रमाणे :


सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक – दीपावली (प्रथम पारितोषिक, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह) , ऋतुरंग (द्वितीय पारितोषिक, पन्नास हजार रुपये आणि सन्मान चिन्ह), पद्मगंधा (तृतीय पारितोषिक, तीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

सर्वोत्कृष्ट विशेषांक – अक्षरदान, पुणे (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह), 

मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक - वयम (७५०० रुपये आणि सन्मान चिन्ह), उत्तेजनार्थ - धमाल मस्ती

उत्कृष्ट दिवाळी अंक – हंस (१५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

उत्कृष्ट कथा – इनसायडर, लेखक – पंकज कुरुलकर, युगांतर दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

उत्कृष्ट कविता – कवयित्री – संगीता बर्वे, मौज दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

उत्कृष्ट मुखपृष्ठ – किरण हणमशेट (चंद्रकांत दिवाळी अंक) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

उत्कृष्ट व्यंगचित्रे – घन:शाम देशमुख (धमाल धमाका दिवाळी अंक) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

याशिवाय, सर्वोत्कृष्ट लेख (अनिल पाटील, चंद्रकांत दिवाळी अंक), लक्षवेधी परिसंवाद (Aघ् चे जग, अक्षर दिवाळी अंक), लक्षवेधी मुलाखत (डॉ. राजुरकर, संवादक – डॉ. विजय पांढरीपांडे, लय भारी दिवाळी अंक) अशी निवड परिक्षकांनी केली आहे.


 रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :


सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक – सृजन (प्रथम पारितोषिक, चाळीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

शब्द संवाद (द्वितीय पारितोषिक, वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)

साहित्य आभा (तृतीय पारितोषिक, दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

उत्तेजनार्थ – आगरी दर्पण, किल्ले रायगड (प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह) 

उत्कृष्ट कथा – आसक्या, प्रा. राजेंद्र सोनवणे (साहित्यविश्व) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह), 

उत्कृष्ट कविता – कोण असे तू, विजय इंद्रकेशव (इंद्रधनू) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)

उत्कृष्ट व्यंगचित्रकार – विवेक मेहेत्रे (साहित्य आभा) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)


स्पर्धेतील सर्व पुरस्कार विजेत्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्पेâ हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व दिवाळी अंकांच्या संपादक, प्रकाशकांचे मनापासून आभार. परिक्षकांचेही आम्ही आभारी आहोत.