MENU

सोनी बीबीसी अर्थने उत्‍साहवर्धक शोजच्‍या लाइन-अपसह साजरा केला वसुंधरा दिन

SANTOSH SAKPAL April 16, 2023 10:55 PM


उन्‍हाळा आला आहेसोनी बीबीसी अर्थने प्रेक्षकांचा हा सुट्टीचा हंगाम संस्‍मरणीय करण्‍यासाठी शोजच्‍या काही अद्भुत लाइन-अपची आखणी केली आहे. चॅनेलने त्‍यांची मोहिम केअर फॉर अर्थकेअर फॉर लाइफअंतर्गत स्‍पेशल अर्थ डे लाइन-अप तयार केली आहे. या शोजचा पर्यावरणीय समस्‍यांबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा आणि प्रेक्षकांना निसर्गाचे संरक्षण करण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे.

कन्‍टेन्‍ट लाइन-अपमध्‍ये चार विचारशील व माहितीपूर्ण शोजचा समावेश आहे. प्रत्‍येक शो आज आपला निसर्ग सामना करत असलेल्‍या विविध आव्‍हानांना दाखवतो. वॉटर ब्रदर्स’ प्रेक्षकांना जागतिक जलीय साहसी कृत्‍यांवर घेऊन जात आपल्‍या जलस्रोतांना असलेल्‍या धोक्‍याला दाखवतो आणि लोकांना पाण्‍याच्‍या महत्त्वाची जाणीव करून देतो. क्‍लायमेट चेंज: अॅडे ऑन द फ्रण्‍टलाइनमध्‍ये लोकांच्या जीवनावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी हवामान बदलाच्या अग्रभागी जाण्‍याकरिता अॅडे अॅडपिटनच्‍या प्रवासाला दाखवतो. ‘ओशियन रेस्क्यू’ हा मानवजातीच्या समुद्राशी असलेल्या बदलत्या नातेसंबंधावर जागतिक दृष्टीकोन प्रदान करतो आणि महासागरातील प्लास्टिक प्रदूषणाच्या विनाशकारी परिणामांवर प्रकाश टाकतो. हा शो परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती काम करणाऱ्या लोकांच्या प्रेरणादायी कथा सादर करतो. ‘स्टेसी डूली इन्व्हेस्टिगेट्स: फॅशन्‍स डर्टी सिक्रेट्स’ फास्ट-फॅशन उद्योगाच्या छुप्या खर्चाच्या आणि त्याचा आपल्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांना उघडकीस आणतो.  

याव्‍यतिरिक्‍त सोनी बीबीसी अर्थने विविध शोज प्रसारित केले आहेतजे प्रेक्षकांच्‍या मनोरंजनाची पूर्तता करतात. गतकाळातील व आधुनिक काळातील उत्‍पादन आविष्‍कारांबाबत लक्षवेधक कथांवर लक्ष केंद्रित करण्‍यासह प्रेक्षक मनोरंजनमाहिती व प्रेरणा मिळण्‍याची अपेक्षा करू शकतात. ट्रिझरर्स डिकोडेड सिरीज ७’ ऐतिहासिक सिक्रेट्सचा उलगडा करण्‍यासाठी आपल्‍या बालपणीच्‍या सर्वात लक्षवेधककाल्‍पनिक कथांना सादर करतो. याउलटइनसाइड द फॅक्‍टरी’ प्रेक्षकांना जगातील काही लक्षवेधक आधुनिक कारखान्‍यांच्या उत्‍साहवर्धक प्रवासावर घेऊन जातो.

 

पहा स्‍पेशल अर्थ डे लाइन-अप २२ एप्रिलपासून सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत