श्री शिवाजी मंदिर बुध्दिबळ स्पर्धा १८ फेब्रुवारीला

Santosh Sakpal February 07, 2024 01:27 PM


मुंबई: NHI NEWS 

    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे श्री शिवाजी मंदिर शालेय मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वा. आयोजित केली आहे. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने ही स्पर्धा ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील ८ वयोगटात राजर्षी शाहू सभागृह, श्री शिवाजी मंदिर, तिसरा मजला, दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ येथे रंगणार आहे. प्रत्येक वयोगटातील पहिल्या दहा मुलांसाठी व पहिल्या पाच मुलींसाठी चषक व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी दिली.


      श्री शिवाजी मंदिर बुध्दिबळ स्पर्धा स्विस लीग पद्धतीने किमान ४ साखळी फेऱ्यांमध्ये १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटच्या वेळ मर्यादेत होईल. स्पर्धकांना घड्याळे व बुध्दिबळ सेटची व्यवस्था संयोजकांमार्फत केली जाणार आहे. स्पर्धेविषयक अधिक माहितीसाठी अथवा प्रवेश अर्जासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सहसचिव ओमकार चव्हाण (९८६९३ ५७७६३) अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्या व्हॉटसअॅपवर ९ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण यांनी केले आहे.


******************************