अब्रुनुकसानीच्या नोटीशीला घाबरत नाही - डॉ. राजू वाघमारे
Santosh Gaikwad
June 24, 2024 07:53 PM
मुंबई, दि. २४ः शिवसेना (ठाकरे) शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांनी पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटीशीला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले. अभ्यंकर यांच्यावर भ्रष्टाचार आणि शिक्षकांचे खच्चीकरण केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या बांबू लावतो, विधानाची वाघमारे यांनी पाठराखण केली. विधानसभेत जनता ठाकरेंना जागा दाखवणार, असा विश्वास व्यक्त केला.अभ्यंकर यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन आदर्श सोसायटीचे सभासद होण्याचा प्रयत्न केला होता. जवानांच्या जागेवर डल्ला मारला, असा आरोप वाघमारे यांनी करताना दुसरीकडे शिक्षकांची गळचेपी करणारे निर्णय घेतल्याची राळ उठवली होती. याप्रकरणी अभ्यंकर यांनी वाघमारे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तसेच नोटीस पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. वाघमारे यांनी नोटीसला घाबरत नसल्याचे म्हटले. दरम्यान, अर्बन नक्षलवादाच्या विधानाबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेली नोटीस म्हणजे पोरखेळ असल्याची जोरदार टीका केली. पक्ष, चिन्ह चोरल्याने शिवसेनेचे (ठाकरे) मताधिक्य शिंदेना मिळाले, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला. हा निव्वळ पोरकटपणा आहे. घटनेच्या आधारावर निवडणूक आयोगाने ठाकरेंना पूर्णपणे शिवसेना प्रक्रियेतून बाजूला केला. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना घटनाबाह्य असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे. केवळ ४ टक्के मराठी मते त्यांना मिळाली असे वाघमारे यांनी सांगितले.
Ketan khedekar
April 30, 2025
Ketan khedekar
April 30, 2025
Ketan khedekar
April 29, 2025
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023