शरद पवार गटाला नवीन चिन्ह मिळालं " तुतारी "

Santosh Gaikwad February 22, 2024 11:10 PM


मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह दिलं आहे. तुतारी हे आता शरद पवार गटाचं नवीन पक्ष चिन्ह असणार आहे. पवार गटानेही आयोगाने दिलेलं चिन्ह मान्य केलं आहे.


शरद पवार गटाकडून याबाबत ट्वीट करत सांगण्यात आलं आहे की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं, ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे.


ट्विटमध्ये पुढे लिहिलं आहे की, ''महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे''