सिनेट निवडणुकीवरून राजकारण तापलं !

Santosh Gaikwad August 18, 2023 05:42 PM


मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर राजकारण तापलं आहे. मुंबई विद्यापीठाने रातोरात पत्रक काढून मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुकांना स्थगिती देताना विद्यापीठाने कोणतंही सबळ कारण दिलं नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमधून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 


युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तर थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.  ज्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते आता निवडणूक स्थगित झाल्यामुळे एकत्र येऊन सरकारविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत, या निवडणुकीत मनविसेची जबाबदारी अमित ठाकरेंकडे आहे. दुसरीकडे युवा सेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात लढणारे दोन नेते आता निवडणूक स्थगित झाल्यानंतर एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात एकत्र येताना दिसण्याचीच शक्यता वाढलीये.


मुंबई विद्यापीठातील 10 सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. 9 ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. 18 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पुढच्या महिन्यात म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होतं, तर 18 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता. जवळपास 95 हजार मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते.  मुंबई विद्यापीठाने रातोरात पत्रक काढून मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुकांना स्थगिती देताना विद्यापीठाने कोणतंही सबळ कारण दिलं नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमधून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने सिनेट निवडणुकीसाठी उभे करण्यात आलेल्या १० उमेदवारांसह मुंबई विद्यापीठ कुलसचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनिल भिरुड यांची भेट घेतली. निवडणूक प्रक्रियेला स्थगिती का देण्यात आली याची विचारणा केली. वरुण देसाई म्हणाले की, “मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.  

 यावर भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी मतदार यादीत त्रुटी असल्याची तक्रार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांना केल्याची माहिती देण्यात आली.  


निवडणूक घेण्यास मिंथे भाजप सरकार घाबरतयं : आदित्य ठाकरेंचा 


सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत निवडणूक घेण्यास मिंथे भाजप सरकार घाबरतयं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 2010 मध्ये लढवली तेव्हा दहापैकी आठ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये १० पैकी १० जागा जिंकल्या होत्या. आमच्यासमोर सगळेच पक्ष होते. तरी देखील आमचा मोठा विजय झाला होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून निवडणुका रखडल्या आहेत. विद्यापीठीचा निवडणूक कार्यक्रम मोठ्या कालावधीनंतर जाहीर करण्यात आला होता. पण एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ती रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती. एका रात्रीत असं काय घडलं की निवडणूक स्थगित झाली ? असा सवाल ठाकरे यांनी केला. 


सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त : अमित ठाकरेंचे राज्यपालांना पत्र  


मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तर थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही, याबद्दल आपले आभारी आहोत, असा खोचक टोला अमित ठाकरे यांनी लगावला आहे.  . उद्या शनिवारी दुपारी अडीच वाजता मनसेच शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. मुंबई विद्यापीठाने अचानक सिनेट निवडणुका स्थगित केल्याने राज्यपालांची भेट घेणार आहे. सिनेटसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या दबावामुळे निवडणुका स्थगित केल्याचा मनसेचा आरोप आहे.