कामगारमहर्षी गं.द. आंबेकर स्मृती विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा २ डिसेंबरपासून

Santosh Sakpal November 27, 2023 07:30 PM

मुंबई : शिवनेर प्रतिनिधी : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा २ ते १३ डिसेंबर दरम्यान परेल येथे होणार आहे. सर्व शाळांसाठी ही स्पर्धा विनाशुल्क खुली असून ४ जणांच्या शालेय कॅरम संघात १५ वर्षाखालील तसेच ईयत्ता ९ वीपर्यंतच्या विध्यार्थी-विध्यार्थिनीना सहभागी होता येईल. पहिल्या चार शालेय संघांना आकर्षक चषक व पदकाने आरएमएमएसचे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येईल.

   आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेची प्राथमिक फेरी विभागवार शाळांमध्ये होणार आहे. त्यामधील उत्कृष्ट चार शालेय कॅरम संघ स्व. आंबेकर स्मृती चषक सुपर लीग कॅरमसाठी पात्र ठरतील. आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा ११ ते १३ डिसेंबर दरम्यान परेल येथील आरएमएमएस सभागृहात होईल. स्पर्धे दरम्यान शालेय खेळाडूंना मोफत मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय कॅरम संघांनी विनाशुल्क प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर (८६५२० ५८८९८ ) किंवा अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २९ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.        


 ******************************************************************