अमित शहांच्या टीकेवर, संजय राऊत म्हणाले, ये डर अच्छा है...

Santosh Gaikwad June 11, 2023 05:06 PM


मुंबई:  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील जाहीर सभेत शिवसेना   ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारीत टीका केली. उद्धव ठाकरे दगा दिला असून, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले अशी टीका केली होती. अमित शहा च्या टीकेला ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर देत खोचक टोला लगावला आहे.


काय आहे संजय राऊत यांचे ट्विट

गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका.  मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपा चे महा संपर्क अभियान होते की. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन.. अमित भाई यांच्या भाषणातील२० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम.शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले.तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे.ये डर अच्छा है.जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे.पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले.एवढा धसका घेतलाय.... असे राऊत यांनी ट्विट मधून अमित शहा यांना प्रतिउत्तर दिलंय.