मोदींकडून आचारसंहितेचा भंग, तक्रार करणार : राऊतांचा इशारा

Santosh Gaikwad April 01, 2024 10:48 AM



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौ-यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी यांची जॉनी लिव्हरशी करीत निवडणूक जाहीर झाल्यानंतरही मोदी सरकारी पैशातून दौरा करत आहेत त्यामुळे आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयेागाला करणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे. 

आरबीआयच्या स्थापनेला आज 90 वर्ष होत असून 91 व्या वर्षात पदार्पण होणार आहे. त्यामुळे आरबीयच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी सोमवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.  मात्र नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणीही पंतप्रधान नसतो. मात्र तरीही मोदी सरकारी पैशातून दौरा करत आहेत. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे असे राऊत म्हणाले.  मोदी यांनी मुंबईत १० सभा घेतल्या तरी सुध्दा भाजप तडीपार होणार आहे असे म्हणत राऊत यांनी मोदींची तुलनात थेट जॉनी लिव्हरशी केली.