*मुंबई प्रतिनिधी
करदात्या मतदात्या सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट सिटी चे स्वप्न* *दाखवणारया कल्याण डोंबिवली* *महानगरपालिकेतील*
*सफाई कर्मचारी वर्ग यांना(आरोग्य खाते)विभागाच्या वतीने एक वर्षा* *आड-गणवेश गंबुट रेनकोट त्यांच्या वतीने कामगारांना दिले जातात*
*महापालिकेमधील सफाई कर्मचाऱ्यांना चक्क-०२/०३-वर्षापासून या वस्तू महानगरपालिकेकडून देण्यात आलेले नाही आहे*
*या अगोदर महानगरपालिकेकडून सर्व चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांना चपला व साबण दिले जात होते आत्ता या वस्तू दिले जात नाही व महानगरपालिकेकडून परिपत्रक काढतात की चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आपले गणवेश परिधान करून कामावर हजर राहावे जेव्हा गणवेश दिले जात नाही तर सफाई कर्मचारी तो परिधान करणार कसा? असा सवाल कर्मचारी विचारत आहेत*
*महापालिका प्रशासक आयुक्तांनी संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा करून चतुर्थ श्रेणी कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेतच गणवेश गंबूट चप्पल साबण छत्र्या वाटप करावे व नियमाचे पालन करायला सांगावे अशी मागणी होत आहे*