३ ऑगस्टपासून रोझरी ट्रॉफी शालेय सांघिक कॅरम स्पर्धा

Santosh Sakpal July 27, 2023 11:13 PM

MUMBAI : फादर नाईझील बॅर्रेट यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल सहकार्याने ३ ऑगस्टपासून रोझरी ट्रॉफी आंतर शालेय सांघिक कॅरम स्पर्धा विनाशुल्क आयोजित करण्यात आली आहे. १५ वर्षाखालील ४ शालेय खेळाडूंच्या कॅरम संघाला विनाशुल्क प्रवेश दिला जाईल. कॅरम स्पर्धेवेळी शालेय खेळाडूंना मोफत मार्गदर्शनदेखील लाभणार असल्याची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली.

डॉकयार्ड रोड येथील रोझरी हायस्कूल सभागृहात शालेय संघांसाठी होणाऱ्या कॅरम स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना आकर्षक रोझरी चषकासह संघामधील खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत. बाद पध्दतीने ही स्पर्धा प्रत्येक फेरीत शालेय संघांच्या तीन एकेरी सामन्यांनी ४ ऑगस्टपर्यंत रंगणार आहे. डीएसओ स्पर्धेची पूर्वतयारी शालेय खेळाडूंना करता येण्यासाठी चँम्पियन कॅरम बोर्डवर सामने होणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय कॅरम संघांनी प्रवेश अर्जासाठी स्पर्धा सहसचिव ओमकार चव्हाण अथवा राम गुडमे-सर (९९६९८ ४४४४१), रोझरी हायस्कूल, डॉकयार्ड रोड हार्बर रेल्वे स्टेशन-पूर्व, मुंबई-४०० ०१० यांच्याकडे २९ जुलैपर्यंत संपर्क साधावा.