मुंबईवर ‘विराट’ विजय;आरसीबीपुढे मुंबईचे लोटांगण

santosh sakpal April 02, 2023 11:52 PM

बंगळुरु : विराट कोहली आणि फॅफ ड्यु प्लेसिस या दोघांनीच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धुलाी केली आणि आरसीबीला मोठा विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोहली आणि फॅफ मैदानात उतरले व चौफेर फटकेबाजी करत त्यांनी संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. फॅफने यावेळी ४३ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. कोहलीने यावेळी ४९ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ८२ धावांची खेळी साकारली.

आरसीबीसाठी विराट कोहलीने ४९ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये विराटने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तसंच कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही आक्रमक फलंदाजी करत ४३ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. फाफने ५ चौकार आणि ६ षटकार मारले. दिनेश कार्तिकला भोपळाही फोडला आला नाही. तर ग्लेन मॅक्सवेलने ३ चेंडूत १२ धावांची खेळी साकारली. मुंबईचे गोलंदाज कॅमेरुन ग्रीन आणि अर्शद खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.

मुंबई इंडियन्सला या सामन्यात सुरुवातीपासून धक्के बसायला सुरुवात झाली होती. इशान किशन हा मुंबईचा पहिला बाद होणारा खेळाडू ठरला. रोहित शर्माला यावेळी दोन जीवदानं मिळाली, पण या दोन्ही गोष्टींचा चांगला फायदा घेता आला नाही. रोहित यावेळी फक्त एक धाव करून तंबूत परतला. सूर्यकुमार यादवलाही यावेळी चांगली फलंदाजी करता आली नाही. सूर्या यावेळी १५ धावा करून तंबूत परतला. मुंबईचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. पण त्यावेळी मुंबईसाठी धावून आला तो तिलक वर्मा. मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कॅमेरून ग्रीन हे नावाजलेले खेळाडू झटपट बाद झाले. पण तिलकने या सामन्यात ४६ चेंडूंत ९ चौकार व सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ८४ धावांची खेळी साकारली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली.

'सूर्या'चे ग्रह फिरले, रोहितने घेतला कठोर निर्णय


सूर्यकुमार यादवचे ग्रह आता चांगलेच फिरलेले आहेत. भारतीय संघातून खेळताना सूर्या फ्लॉप ठरला होता. आता तर रोहित शर्मानेही त्याच्याबाबत कठोर निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सूर्या भन्नाट फॉर्मात होता. त्यावेळी तो भारताचा तारणहार वाटत होता. आयपीएलनंतर आशिया चषकातही त्याने दमदार कामगिरी केली होती. टी-२० विश्वचषकातही तो चमकला होता. आयसीसीने तर त्याला पुरस्कार दिला होता, त्याचा गौरव केला होता. पण वासे फिरले आणि त्यानंतर सूर्या हा तळपायचा बंद झाला. कारण सूर्या हा एकामागून एका सामन्यात अपयशी ठरायला लागला. सूर्याला संधी दिल्या, पण तो अपयशी ठरल्याने भारतीय संघातून त्याला बाहेर काढण्यात आले. पण आता आयपीएलमधूनही मुंबई इंडियन्सने त्याची विकेट काढल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबईचा डाव संपला आणि त्यांचे खेळाडू गोलंदाजीसाठी मैदानात उतरले. त्यावेळी सूर्या हा मैदानात उतरला नाही. त्यावेळी नेमकं काय चाललंय हे कोणाला समजले नाही. काही जणांना सूर्याला दुखापत झाल्याचे वाटले. पण सूर्याला दुखापत झाली नाही तर वेगवान गोलंदाज जेसनला संघात घेण्यासाठी त्यांनी सूर्याला बाकावर बसवले. यावेळी Impact Player नियम मुंबई इंडियन्सने वापरला. सूर्या हा संघाचा उप कर्णधार आहे, त्याचबरोबर रोहितनंतर सूर्याकडे मुंबईची धुरा येणार आहे. पण तरीही वाईट फॉर्मात असलेल्या सूर्याला बाकावर बसवण्याचा कठोर निर्णय रोहित शर्माने घेतला.