रिझर्व बँक ऑफ इंडिया ने २४ एप्रिल २०२५ पासून चेक बाउन्स बाबत आता नवीन नियम केले आहेत. या नियमांमुळे वित्तीय संस्था आणि खातेधारक या दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे ते नवे नियम. चला त्यावर एक दृष्टिक्षेप टाकू:
१) चेक बाउन्स झाल्यानंतर बँकांनी ग्राहकांना२४ तासांच्या आत एसएमएस आणि ई-मेल द्वारे कळवावे.
२) सलग तीन चेक बाउल झाल्यास बँकांना ग्राहकाचे पुढील चेक साठी तात्पुरते खाते गोठविण्यास अनुमती देण्यात आली आहे.
३) चेक रिटर्न चार्जेस आता बँकेनुसार कमी अधिक न राहता सर्व बँकांचे चार्जेस समान असतील.
४) इतर बँकांना सावध करण्यासाठी वारंवार चेक बाउन्स करणाऱ्या खातेदाराला आरबीआयच्या डेटाबेस मध्ये चिन्हांकित (रेड फ्लॅग) केले जाईल.
५) वारंवार चेक बाउन्स होणाऱ्या खातेदारांवर ( विशेषतः कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने चेकचा वापर करणाऱ्या खातेदारासाठी) चेक बुक वर कायमची बंदी घालण्याची कारवाई करण्याची पूर्वीची पद्धत आता बंद करण्यात आली आहे.