भाजपकडून राममंदिर उद्घाटनाचा राजकीय इव्हेंट : प्रकाश आंबेडकर यांची टीका

Santosh Gaikwad January 18, 2024 11:28 PM


मुंबई:  २२ जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. एकीकडे देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत असतानाच राजकीय मैदानात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्ष राममंदिर उद्घाटनाचा राजकीय इव्हेंट करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट भाजप आरएसएसवर निशाणा साधला आहे.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कसलेही तत्व आणि नैतिकता न बाळगता, भाजप- आरएसएस राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून देवालाच काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.भाजप आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत..' अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांनी केली आहे.


दरम्यान, याआधी प्रकाश आंबेडकर यांनी राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र मी जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर करत असल्याचा घणाघात केला होता.