योग्य उपचारांअभावी प्राची आगेडकरचे खेळाडू होण्याचे स्वप्न मातीमोल

Santosh Sakpal May 10, 2023 10:52 PM

सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी योग्य त्या उपायोजना कराव्यात - निलेश सांबरे

ठाणे:  गोर गारीब असलेल्या अनेक रुग्णांना सरकारी रुग्णालये ही एक मोठा आधार असतात . मात्र सरकारी रुग्णालयाची दुरावस्था हा तर ऐरणीवरचा मुद्दा झाला आहे.  या रुग्णालयात मिळणारी सेवा पाहता भिक नको पण कुत्रं आवर अशी असतेकित्येकदा तर मरण येत नाही म्हणून खितपत जगायचं एवढी हतबलता त्या रुग्णाच्या वाट्याला येत असतेआणि उमेदीच्या वयात जर एखादा आजार अथवा अपघात झाला तर एखाद्या गरीब रुग्णाची आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आयुष्याची वाताहात होतेस्वप्नांची राखरांगोळी होतेअसेच काहीसे घडले आहे प्राची आगेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या बाबतीत.

ठाण्यातील सावरकर नगर येथे राहणा-या प्राची आगेडकर या २३ वर्षीय मुलीचा १० वीत असताना पाच सहा  वर्षापूर्वी  शाळेत कबड्डी खेळताना एक अपघात झाला होता . तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.  मात्र काही काळानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा एकादा तिला जास्त त्रास होवू लागलात्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिचा MRI काढला तेव्हा त्यात तिच्या पायाच्या लीगामेंटला गंभीर दुखापत झाल्यचे सांगण्यात आलेत्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आलायावेळी त्यांना ३० – ४० हजार रुपये अपेक्षित खर्च सांगण्यात आला फेब्रुवारी २०२३ या तारखेला शस्त्रक्रिया करण्यासाठीची वेळ देण्यात आली होतीमात्र त्यानंतर रुग्णालयाच्या दुरुस्तीचे कारण देत ऑपरेशनची तारीख पुढे ढकलण्यात आलीत्यानंतर १६ मार्च ही तारीख देण्यात आली.  त्या ठीकाणी भूल्चे इंजेक्शन देऊन शास्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले मात्र यावेळी निकीट नावाचे बेल्ट साहित्य जे या उपचारादरम्यान वापरले जाते ते यावेळी तुटले.  दुसरा नवीन निकीटबेल्ट (पट्टा वापरता तोच बेल्ट पुन्हा चिकटपट्टी लावून वापरण्यात आलात्यांनंतर काही कारणास्तव त्या शस्त्रक्रियेसाठी त्या रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगत भूल असतनाच शस्त्रक्रिया  करताच तिला डिस्चार्ज देण्यात आलाझालेल्या प्रकाराबाबत रुग्णाच्या कुटुंबियांची रुग्णालयातील व्यवस्थापनाकडून माफी देखील मागण्यात आलीनंतर त्या रुग्णाला ठाण्यातील सिद्धीविनायक रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला . सुरुवातीला येथील खर्च हा ८० हजार होईल असे सांगण्यात आलेनंतर ऑपरेशन सुरु असताना पायाची एक नस फाटली असून अजून एक लाख खर्च होईल असे सांगण्यात आले.  आपल्या रुग्णाचा पाय वाचावा म्हणून त्यांनी कसेतरी हे पैसे जमवलेप्राचीचे वडिल हे साधे नोकरदार आहेत त्यांनी पै पै जमा केलेली सगळी रक्कम आणि घरातील असलेले दागिने विकून तसेच थोडेफार उसनवारी घेऊन  ही रक्कम हॉस्पिटलला अदा केली . जिजाऊ संस्थेने देखील या दरम्यान या कुटुंबाला आर्थिक सहकार्य केले होते.

मुलीचा उपचाराचा खर्च तर केला मात्र आता आगेडकर कुटुंबीयासमोर कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न उभा राहिला आहेजर का सरकारी रुग्णालयात या सुविधा असत्या तर या कुटुंबीयांवर अशी वेळ आली नसतीमुख्यमंत्री महोदयांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे.

तर या घटनेबद्दल जिजाऊ सामाजिक संस्थेने ठाणे महापलिकेच्या आरोग्य सुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून ठाणे सारख्या शहरात जर अश्या घटना घडत असतील तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून याकडे मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्तीशलक्ष घालून येथील सर्वसामान्य जनतेला योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यातत्यांची हेळसांड होऊ नये यासाठी योग्य त्या उपायोजना कराव्यात अशी मागणी देखील जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केली आहे.