महाराष्ट्रात पॉलिटीकल ड्रामा : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली, अजित पवारांसह ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ !

Santosh Gaikwad July 02, 2023 03:21 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नाटयमय घडामोडी घडत  पून्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पून्हा एकदा ३० आमदारासंह बंड करीत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी तिस-यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल  पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आदिती तटकरे यांच्या रूपाने शिंदे फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस  यांनी नव्या मंत्रयांना  पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 


आज सकाळी देवगीरी बंगल्यावर अजित पवारांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. अजित पवार यांच्या नाराजीच्या बातमीनंतर पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी या निवासस्थानी आले होते. पवारांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आलं नाही. त्यानंतर   अजित पवार हे संबंधित आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन राजभवनावर दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेतेही मंत्रीपदाची शपथ घेतली. 


अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते असे म्हटले जात होते. अखेर अजित पवार यांनी बंड पुकारत थेट शिंद-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.