अजय देवगनच्या वडिलांनी मला स्वतःची लघवी पिण्यास सांगितले : परेश रावल*

Ketan khedekar April 28, 2025 02:27 PM

मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)

दुखापत झाल्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो होतो. त्यावेळी अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांनी मला पंधरा दिवस स्वतःची लघवी पिण्यास सांगितले. मी त्याप्रमाणे केले. त्यानंतर घेतलेला एक्स-रे पाहून डॉक्टर देखील चकित झाले. माझी हाडे जोडली गेली होती. मला किमान अडीच महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार होते. पण दीड महिन्यातच मला डिस्चार्ज मिळाला, अशी माहिती सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी लल्लन टॉप ला दिलेल्या मुलाखतीत दिली.


  या मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकर यांचा एक खुमासदार किस्सा सांगितला. आपल्या सिनेमाच्या निर्मात्याबरोबर भोजन घेतल्यानंतर नानाने कशी त्याला भांडी घासायला लावली हे परेश रावल यांनी सांगितले. १ कोटी रुपये बिदागी घेणारा आपण पहिला चरित्र अभिनेता असल्याचेही त्यांनी सांगितले.