BIG BREAKING: छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ला, 11 जवान शहीद :दंतेवाडामध्ये वाहनाला IEDने उडवले

SANTOSH SAKPAL April 26, 2023 03:42 PM

पावसात अडकलेल्या जवानांना आणण्यासाठी गेली होती टीम

 
 
 

दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेलीदरम्यान हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली आहे. या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी वाहनावर बॉम्ब फेकले.

बघेल म्हणाले - नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- दंतेवाडा येथे सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात जवान शहीद झाल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही.

 


आठवडाभरापूर्वी आमदारांच्या ताफ्यावर झाला होता हल्ला

विजापूरमधील काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी आठवड्याभरापूर्वी हल्ला केला होता. जिल्हा पंचायत सदस्या पार्वती कश्यप ज्या वाहनात बसल्या होत्या त्या वाहनावर गोळीबार झाला. सर्वजण सुरक्षित आहेत. आमदार विक्रम मांडवी, जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस नेते गांगलूरला गेले होते. येथील साप्ताहिक बाजारात मंगळवारी नुक्कड सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतत असताना पडेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी धावत्या वाहनांवर गोळीबार केला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं ट्वीट

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यानंतर ट्वीट केलं आहे. “अरणपूरमधील दंतेवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी पथक तिथे कारवाईसाठी निघाले असता नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये १० डीआरजी जवान आणि त्यांच्या वाहनाचा चालक असे ११ जण शहीद झाल्याचं वृत्त अत्यंत दु:खद आहे. राज्यातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असं भूपेश बघेल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

BGL ने 2 वर्षांपूर्वी सैनिकांवर गोळीबार केला होता, 22 जवान शहीद झाले होते

3 एप्रिल 2021 रोजी विजापूर जिल्ह्यातील ताररेम पोलीस स्टेशन क्षेत्रातील टेकलगुडा येथे झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले होते, 35 हून अधिक जखमी झाले होते. त्यांच्यावर 350 ते 400 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये माओवाद्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. जवानांवर मोठ्या प्रमाणात बीजीएल (बॅरल ग्रेनेड लाँचर) फायरिंग करण्यात आली होती. यासोबतच डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बटालियनच्या जवानांकडून शस्त्रेही लुटण्यात आली होती.

राकेश्‍वर सिंह मन्हास या कोब्रा जवानाचे अपहरण करण्यात आले. जवानांकडून शस्त्रेही लुटण्यात आली. या चकमकीत नक्षलवाद्यांनी त्यांच्या TCOC दरम्यान ही घटना घडवून आणली. नंतर जवान राकेश्‍वर सिंग यांना माओवाद्यांनी सोडले.