नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात : काँग्रेसचा भाजपवर निशाणा !

Santosh Gaikwad April 10, 2024 02:21 PM


मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा मंगळवारी (9 एप्रिल) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.  


अतुल लोंढे यांनी ट्वीट करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे. तसेच त्यांनी म्हटले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, अशी माहिती अतुल लोंढे यांनी दिली.