माझा सिंधुदुर्ग परिवाराचे "स्नेहसंमेलन २०२४" दिमाखात संपन्न

Santosh Sakpal March 02, 2024 11:26 AM

ठाणे : माझा सिंधुदुर्ग परिवाराचे "स्नेहसंमेलन २०२४" आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० ते २:०० या वेळेत गडकरी रंगायतन ठाणे येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे विद्यमान आमदार . मा. रविंद्र फाटक , श्री. सिताराम राणे (अध्यक्ष-ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड), भजनसम्राट बुवा श्रीधर मुणगेकर , चित्रकार सतिश खोत, चित्रपट दिग्दर्शक अभिजीत वारंग , सामाजिक कार्यकर्ते श्री बाळा गवस व कु. श्रेया अनिल धुरी ( सिंधुदुर्गातील पहिली महिला पखवाज विशारद) उपस्थित होते.

सुप्रसिद्ध निवेदक ऋषी देसाई यांचे बहारदार सूत्रसंचालन, क्षितीजा गावडे व ग्रुप यांची गणेशवंदना, प्रसिद्ध कलाकार श्री गणेश टिकम यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज , कवयित्री डॉ. सई लळीत यांच्या कवितांवर आधारीत कलाविष्कार "भावबंद कोकणचे" आणि सारा काजू तर्फे लकी ड्रॉ व गिफ्ट हँपर हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते

यावेळी मालवणी मुलुखातील विविध नामांकीत व्यक्तिमत्वे, मालवणी ग्रुप्स, रक्तदान ग्रुप , युट्यूबर्स, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती इत्या चा माझा सिंधुदुर्ग च्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी माझा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. विकास पालव यांनी स्नेहसंमेलनामागची आपली भुमिका स्पष्ट केली. माझा सिंधुदुर्ग तर्फे घेण्यात येणाऱ्या " शालेय शिष्यवृत्ती " उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तळागाळत जाऊन जास्तीत जास्त गरजू शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास पालव, अमित कांदळगावकर , संदीप साईल, सुधीर गावडे, स्वप्नील तेली, पांडुरंग पालव, नितीन नाईक, कृष्णा कदम, मंदार पारकर , प्रशांत दुखंडे, रेणुका राऊळ , अरिन टिकम, ओमकार कुबल, स्वप्नील पालव व सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.