सत्ता तुमच्या हातात, चौकशी करा : शरद पवारांचे नरेंद्र मोदींना आव्हान

Santosh Gaikwad August 30, 2023 08:00 PM


मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडून घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरुन केल्या जाणाऱ्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं. घोटाळयांचे नुसते आरोप करू नका सत्ता तुमच्या हातात आहे चौकशी करा असे आव्हानच पवारांनी मोदींना दिले. 


शरद पवार काय म्हणाले?


उद्याच्या बैठकीला २८ राजकीय पक्ष आणि त्यांचे ६३ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विविध राज्यातून लोकांचा प्रतिसाद आहे. त्यामुळं पर्यायी मंच देशात तयार होईल. यातून देशात परिवर्तनाचं काम होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मायावती या नक्की कुणाबरोबर एकत्रित जाण्याची भूमिका घेणार हे स्पष्ट झालेलं नाही. काही वेळा त्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका ठेवलेली होती. त्यामुळं त्याच्यावर आताच बोलणं योग्य ठरणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.


नरेंद्र मोदी यांच्याकडून घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरुन केल्या जाणाऱ्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मी पंतप्रधानांचं भोपाळचं भाषण ऐकलं. त्यात त्यांनी काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधानांनी राज्य सहकारी बँक, सिंचन घोटाळा याबद्दल आरोप केले होते. माझं आव्हान त्यांना आहे त्या प्रकरणाची चौकशी करा आणि देशाला काय सत्य परिस्थिती आहे ते सांगा, असं शरद पवार म्हणाले. जे सहकारी सोडून गेले त्यांना लोक मतदानाच्या वेळी जागा दाखवतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.