निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाने स्थापन केला पूर्णवेळ नियंत्रण कक्ष

Santosh Gaikwad March 21, 2024 08:17 PM



 मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पैशांचा गैरवापर रोखता यावा यासाठी उपाययोजना करण्यास, मुंबईतील प्राप्तिकर विभाग कटिबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात, यासाठी, मुंबई प्राप्तिकर विभागाने, निवडणुकांच्या खर्चावर देखरेख ठेवता येईल,यासाठी  २४x७म्हणजेच पूर्णवेळ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुंबईतील निवडणुक मतदान होईपर्यंत, म्हणजे २० मे २०२४ पर्यंत हा कक्ष कार्यरत राहील. या नियंत्रण कक्षात सजग नागरिक या कक्षाला, पैशांचे अथवा मौल्यवान वस्तूंच्या व्यवहाराबद्दल माहिती देऊ शकतात. लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी नागरिकांनी अशी माहिती प्राप्तिकर विभागाला सादर करावी, अशी विनंती प्राप्तिकर विभागाने केली आहे.


माहिती देण्यासाठीचे टोल फ्री क्रमांक, व्हॉट्स ॲप क्रमांक/ दूरध्वनी क्रमांक आणि ई मेल पुढील प्रमाणे आहेत :

टोल फ्री क्रमांक : 1800-221-510
व्हॉट्स ॲप/भ्रमण ध्वनी क्रमांक : 8976176276/ 8976176776
ईमेल आय डी : mumbai.addldit.inv7@incometax.gov.in
नियंत्रण कक्षाचा पत्ता : खोली क्रमांक. 316, तिसरा मजला, सिंधीया हाऊस , बलार्ड इस्टेट , मुंबई i-400001