आता प्रवाशांच्या सेवेत प्रदुषण न करणारी बॅटरीवर चालणारी शिवनेरी
santosh sakpal
May 01, 2023 09:46 PM
एसटी महामंडळसाठी ओलेक्ट्रा कंपनीच्या ई शिवनेरी प्रवासी सेवेत दाखल
ई-शिवनेरी इलेक्ट्रिक बस ठाणे ते पुण्याच्या स्वारगेट दरम्यान धावणार
येत्या काही महिन्यांत ओलेक्ट्रा एकूण 100 ई-शिवनेरी बसेस सेवेत येणार
या ई-बसमध्ये ४३ आणि २ चालक एवढी आसन क्षमता.

मुंबई, 1 मे, 2023: पर्यावरण रक्षणासाठी सदैव प्रयत्नशिल असणाऱ्या महाराष्ट्राने आता पुणे मुंबई दरम्यान इंटरसिटी इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत आणल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या ई-शिवनेरी इंटरसिटी इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले.
ऑलेक्ट्रा ग्रिनटेकने ही इलेक्ट्रिक उर्जेवर धावणारी , आवाजरहित, प्रदुषण रहित इंटरसिटी ई-बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) सुपुर्द केली आहे. ई-बसमध्ये 4३ प्रवासी + २ ड्रायव्हर एवढी आसन क्षमता आहे आणि ही बस एका चार्जवर 250 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. आता एकूण 28 बसेस महामंडळाकडे सुपुर्द करण्यात येत आहेत.

ठाणे ते पुण्यातील स्वारगेटपर्यंत ही नवीकोरी इंटरसिटी इलेक्ट्रिक बस तात्काळ प्रवाशांच्या सेवेत येईल. ऑलेक्ट्रा येत्या काही महिन्यांत एमएसआरटीसीला एकूण 100 ई-शिवनेरी ई-बसचा पुरवठा करेल. ई-बस आर्थीक राजधानी मुंबईतून आणि घाटमार्गे आशियाचे ऑक्सफर्ड असलेल्या पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी आणि गारेगार , उत्तम प्रवासाचा अनुभव देईल.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावप आधारित या इलेक्ट्रिक बसमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, यामध्ये ABS सह डिस्क ब्रेक, सीसीटीव्ही कॅमेरे, रिअल-टाइम ट्रॅकिंग, भरपूर सामानासाठी जागा, युएसबी कनेक्शन सह सीट बेल्टसह पुश-बॅक सीट आणि प्रगत वाहन व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश आहे.
Ketan khedekar
April 30, 2025
Ketan khedekar
April 30, 2025
Ketan khedekar
April 29, 2025
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023