जळगावात भाजपला धक्का : खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटात दाखल !

Santosh Gaikwad April 03, 2024 10:08 PM



मुंबई: भाजपाचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. आजच त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेष पाटील यांचं तिकीट भाजपाने कापलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांनी थेट भाजपाला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना जळगावातून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ठाकरेंनी करण पवार यांना जळगावातून मैदानात उतरवलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कल्याण डोंबिवली, हातकणंगले, जळगाव आणि पालघर या जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. 


या चार जागांवर उमेदवार घोषित

वैशाली दरेकर-राणे – कल्याण डोंबिवली
सत्यजित पाटील – हातकणंगले
करण पवार – जळगाव
भारती कामडी-पालघर