खंडणी प्रकरण, मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अडचणीत वाढ

Santosh Gaikwad May 04, 2024 10:09 PM


मुंबई : एका ज्वेलर्सकडे पाच कोटीची खंडणी प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र राजकीय विरोधकांनी बदनामीचा कट रचल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. दरम्यान ज्वेलर्सच्या मुलाला पोलिसांसमोरच मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्याने  अविनाश जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

न्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप करत पोलीसात तक्रार दाखल केली. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम 385, 143, 147, 323, 120ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता ज्वेलर्सच्या मुलाला पोलिसांसमोर मारहाण करणारा व्हिडीओ आला समोर आहे. त्यामुळे अविनाश जाधव यांच्या अडचणी वाढणार आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.