मिशन लोकसभा : शिंदेच्या शिवसेनेचे ४८ मतदारसंघात पदाधिकारी जाहीर !

Santosh Gaikwad December 05, 2023 07:30 PM



मुंबई :  पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू  लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेने ४८ मतदार संघात विभागीय संपर्क नेते आणि जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. मिशन २०२४ च्या दृष्टीने महायुतीची ही आक्रमक रणनिती  समजली जात आहे. 

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे तर काँग्रेसला तेलंगणात यश मिळालं आहे. भाजपला तीन राज्यात मिळालेल्या यशाने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.  दोन ते तीन महिन्यात लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे त्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. भाजपबरोबर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सत्तेत सामील आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुक महायुती म्हणून लढवली जाणार आहे.  शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत सर्वांच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निर्णायक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या नेमणुकांमध्ये विद्यमान मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत विभागीय संपर्क नेते आणि जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांमध्ये समन्वय राखून महायुतीचा उमेदवार निवडुन आणण्याची रणनिती आखली जाणार आहे. 

जिल्हा निहाय लोकसभा निरीक्षक 

 नंदुरबार जिल्ह्यासाठी   राजेश पाटील, धुळे जिल्ह्यासाठी   प्रसाद ढोमसे, जळगाव जिल्ह्यासाठी   सुनील चौधरी, रावेर जिल्ह्यासाठी  विजय देशमुख, बुलढाणा जिल्ह्यासाठी  अशोक शिंदे, अकोला जिल्ह्यासाठी   भूपेंद्र कवळी, अमरावती साठी   मनोज हिरवे, वर्धा जिल्ह्यासाठी   परमेश्वर कदम, रामटेक जिल्ह्यासाठी  अरुण जगताप, नागपूर  अनिल पडवळ, भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी  आशिष देसाई, गडचिरोली-चिमूर जिल्ह्यासाठी मंगेश काशीकर, चंद्रपूर साठी  किरण लांडगे, यवतमाळ-वाशिम जिल्ह्यासाठी   गोपीकिशन बजौरीया, हिंगोली जिल्ह्यासाठी   सुभाष सावंत, नांदेड जिल्ह्यासाठी   दिलीप शिंदे, परभणी जिल्ह्यासाठी   सुभाष  साळुंखे, जालना जिल्ह्यासाठी  विष्णू सावंत, छत्रपती संभाजीनगर साठी अमित गिते, दिंडोरी जिल्ह्यासाठी   सुनील पाटील, नाशिकसाठी जयंत साठे, पालघर जिल्ह्यासाठी  रवींद्र फाटक, भिवंडी साठी   प्रकाश पाटील, रायगडसाठी  मंगेश सातमकर, मावळसाठी   विश्वनाथ  राणे, पुणे जिल्ह्यासाठी  किशोर भोसले, शिरूर साठी  अशोक पाटील, नगर जिल्ह्यासाठी  अभिजित कदम, शिर्डी साठी   राजेंद्र चौधरी, बीड जिल्ह्यासाठी डॉ. विजय पाटील, धाराशिव जिल्ह्यासाठी   रवींद्र गायकवाड, लातूर जिल्ह्यासाठी  बालाजी काकडे, सोलापूर जिल्ह्यासाठी  इरफान सय्यद, माढा जिल्ह्यासाठी   कृष्णा हेगडे, सांगली जिल्ह्यासाठी राजेश क्षीरसागर, सातारा जिल्ह्यासाठी  शरद कणसे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी   राजेंद्र फाटक, कोल्हापूरसाठी   उदय सामंत, तर हातकणंगले जिल्ह्यासाठी   योगेश जानकर यांची निवड करण्यात आली आहे.     

या जिल्हयाचे संपर्क नेते 

उदय सामंत : कोकण विभागाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग   
नरेश म्हस्के : ठाणे, पालघर  
 सिद्धेश कदम व   किरण पावसकर : मुंबई शहर व उपनगर 
आनंदराव जाधव :  मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांसाठी  
अर्जुन खोतकर : जालना, संभाजीनगर, परभणी व बीड जिल्ह्यांसाठी  
भाऊसाहेब चौधरी  : उत्तर महाराष्ट्रात मोडणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर  
 विजय शिवतारे  : पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर  
संजय मशीलकर  : पुणे, सोलापूर  
 दीपक सावंत  : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली  
 विलास पारकर : पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती  
  विलास चावरी  : वाशीम, यवतमाळ व वर्धा