वानखेडे मैदानात कॅमरून ग्रीनचं वादळी शतक, हैदराबादचा पराभव करून मुंबईने फडकवला विजयाचा झेंडा

Santosh Sakpal May 22, 2023 08:47 AM

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात मुंबईने कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर १८ षटकांत लक्ष्य गाठले

मुंबई : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माच्या संघाने अवघ्या १८ षटकांत २ बाद २०१ धावा करत सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. तथापि, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे चाहते प्रार्थना करतील की, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावा.

अन् मुंबई इंडियन्सस

प्लेऑफ साठी पात्र ठरला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघचा गुजरात टायटन्सने शुभम गिलच्या तुफानी शतकाच्या जोरावर पराभव केला अन् मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठि दरवाजे उघडले. जर बंगळुरू संघ जिंकला असता तर जरि मुंबईने विजय मिळवला असला तरी गुण पात्रता 16 -16 अशी असताना सरस धावगतीच्या जोरावर विराट कोहलीचा संघ प्लेऑफच्या फेरीत पोहचला असता. पण पराभव झाला आणि बंगळुरुचे 14 गुण झाले. पण पराभव झाला तरी विराट कोहली चमकला. त्याच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीने कालचा सामना अविस्मरणीय ठरला.